मुबंई पुणा जुन्या महामार्गावर अपघातात 1 ठार तर चार जखमी.

0
947

खोपोली.

मुबंई पुणे एक्सप्रेस हायवेरुन खोपोली एक्झीटने मुबंई कडे येणा-या मार्गावर उलट दिशेने चाललेल्या खाद्य तेलाच्या टँकरने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन रस्त्यावरील दोन ट्रक व एक पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिल्याने खोपोली शिळफाटा येथे पटेल नगरजवळ भीषण अपघात.

या अपघाता रस्त्याच्या कडेला असणा-या गॅरेजमधील तीन कार व मोटारसायकलचेही नुकसान.

अपघात घडताच घटनास्थळी पटेलनगर मधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेऊन मदत कार्य सुरु केले.

घटनास्थळी खोपोली पोलीसांनी तात्काळ सर्व वाहनांना तात्काळ बाजुला करुन रस्ता मोकळा करण्यास सुरुवात करुन मृत व जखमीनां खोपोली रुग्णालयात पोहचवले.
अपघातानतंर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आँईल सांडुन रस्त्याचा मोठा भाग निसरडा झाल्याने बराच वेळ यत्रंणा व मजुरांच्या साह्याने रस्त्यावर माती टाकण्याचे काम सुरु होते.