खोपोली पोलीस दलातील सुधीर मोरे “पोलीस महासंचालक पदकाने” सन्मानित ..

0
1200

खोपोली :
दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक मुंबई यांच्या कडुन “पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह” जाहीर करण्यात येतात.
यावर्षी खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्री.सुधीर मोरे यांना “पोलीस महासंचालक पदकाने “सन्मानित करण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असून सर्वांना सहकार्य करणे हा त्यांचा स्वभाव सर्वांना परिचित आहे. 29 जानेवारी 1999 पासून पोलीस दलात कार्यरत असून अलिबाग, वडखळ, पेण येथील सेवेनंतर आता खोपोली येथे कार्यरत आहेत. प्रदीर्घ सेवेचा अनुभव व उल्लेखनीय काम याची नोंद घेऊन यावर्षी त्यांना गौरविण्यात आले. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्याने 1 मे 2020 रोजी खोपोली पोलीस स्टेशन येथे खालापूर तालुक्याचे पोलीस उप विभागीय अधिकारी डॉ.रणजित पाटील यांनी सदर पदक देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर व निवडक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
कर्तव्यनिष्ठ सुधीर मोरे यांच्या गौरवाबद्दल खालापूर तालुक्यातुन त्यांचे कौतुक होत आहे.