खोपोलीमध्ये गांजा बाळगणाऱ्या दोघास अटक… खोपोली पोलिसांची धडक कारवाई…

0
3713

खोपोलीमध्ये गांजा बाळगणाऱ्या दोघास अटक
खोपोली पोलिसांची धडक कारवाई…

कोरोना व्हायरस मुळे अनेक कुटुंबियांचे भुकेने हाल होत आहेत, अश्या परिस्थितीत आजही अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची संख्या ही नेत्रदीपक आहे,खोपोली पोलिसांनी चोखपणे सर्वच परिस्थितीवर नियंत्रण ठेवताना खोपोलीत व्यसन करणाऱ्या मंडळींना मात्र चाप बसत आहे. नुकतीच अवैध दारू विक्री करणाऱयांना रंगेहात पकडून दिल्याने खोपोली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असताना गांजा रॅकेट पकडण्यात सुद्धा यश आलेले आहे.
दिनांक 21 एप्रिल रोजी पेट्रोलिंग करीत असताना शीळफाटा परिसरात एक महिला संशयास्पद रित्या आढळली. सदर महिलेची चौकशी करीत असताना तिच्याकडे असलेल्या पिशवीत 1 kg 900 ग्राम गांजा सापडला. सदर महिलेचे नाव क्षमा उर्फ शम्मी शेख असून अधिक चौकशी केली असता हा गांजा खालापूर तालुक्यातील धामणी या गावातील अशोक चव्हाण, वय 40 यांच्याकडून घेतल्याचे तपासात उघड झाले.
खोपोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा क्रमांक 69/2020 अन्वये NDPS 1985 अंतर्गत 8C व 20 ब प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
खालापूर तालुक्याचे उप विभागीय अधिकारी डॉ. रणजित पाटील व खोपोली पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आसवर,पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग,पोलीस शिपाई प्रवीण भालेराव, कादर तांबोळी, नूलके,प्राची शेळके यांनी ही कारवाई केली.
पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अमोल वळसंग करीत आहेत.
गेल्या काही दिवसापासून मटका,जुगार,दारू व गांजा यांच्या विरोधात धडक कारवाई करणाऱ्या खोपोली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.