खोपोलीत बाजारपेठेत शिवभोजनाची व्यवस्था ….

0
1218

खोपोलीत बाजारपेठेत शिवभोजनाची व्यवस्था ….

कोरोना व्हायरस मुळे अनेक कुटुंबाचे जेवणाचे हाल होत आहेत. शासन व्यवस्था व विविध सामाजिक संघटना याकामी मदत करीत आहेत.राज्य सरकारच्या भुकेल्याना अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करून देणाऱ्या शिव भोजन चा अनेकांना दिलासा आहे.
महिला बचत गट,सामाजिक व राजकीय संघटनांच्या माध्यमातून नेत्रदिपक कार्य करणाऱ्या सुवर्णा मोरे यांनी पुढाकार घेऊन आम्रपाली महिला बचत गट च्या माध्यमातून खोपोली बाजारपेठेत शिवभोजन उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेऊन शिवभोजन उपक्रमाचा दिनांक 21 एप्रिल रोजी खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल,ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल,नगरसेविका केविना गायकवाड,डॉ. माधव जोशी व इतर मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ केला. यावेळी सोशल डिस्टन्स चे भान पाळून गरजूंना भोजन उपलब्ध करून देण्यात आले.
या सुविधेमुळे जवळपासच्या गरजू लोकांना भोजनाची व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
खोपोली शहरात सुवर्णा मोरे व त्यांना सोबत देणाऱ्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.