नेरळ मधला एक कोविड-१९ पॉझिटिव्ह रूग्ण सापडला तर नेरळचा तीन किलो मिटर परिसर सिल !

0
7628

 

कर्जत : – आनंद सकपाळ,

कर्जत तालुक्यातील नेरळ गावातील सुगवेकर आळी येथील राहाणार चाळीस वर्षीय तरूण हा ऐरोली दिघा येथील सँडोज फॉर्मासि या कंपनीत कामाला असुन लॉक डाऊन काळात हा तरूण नेरळ ते कंपनी असा कंपनीच्या गाडीने प्रवास करीत होता परंतू कंपनी मधील तरूण कोविड – १९ पॉझिटिव्ह आढळून आल्याने कंपनीने सर्व कामगारांना घरीच कॉरनटाईन होण्याच्या सुचना देण्यात आल्या प्रमाणे हा तरूण नेरळ मधिल सुगवेकर आळी येथील आपल्या घरी आपल्या कुंटूबासह कॉरनटाईन होता दि. १४ एप्रिल २०२० रोजी सदर तरूणाला कोविड – १९ ची टेस्ट करण्यासाठी कंपनीच्या गाडीतून ठाणा येथे घेऊन गेले होते तर सदर तरूणास ठाणा येथेच कॉरनटाईन करण्यात आले होते परंतू दि. १९ एप्रिल २०२० रोजी सदर तरूणाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला असल्याने सदर बाब ही या तरूणाने नेरळ शिवसेना शहर प्रमुख रोहिदास मोरे यांना फोन करून सांगून सदर माझ्या कंटूबांची टेस्ट करून त्यांची काळजी घेण्यास सांगितल्या प्रमाणे रोहिदास मोरे यांनी ही घटना नेरळ पोलीस ठाण्याचे निरिक्षक अविनाश पाटील व आरोग्य विभागाच्या लक्षात आणून त्या तरूणाची आई वय वर्ष ६५, पत्नी वय वर्ष ३५, मुलगी वय वर्ष १५, मुलगी वय वर्ष ७ यांची स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून पुढील टेस्ट करिता खारघर येथे पाठवण्यात आले असुन सुगवेकरआळीचा संपूर्ण परिसर सिल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या संर्पकात आलेल्या लोकांची माहिती घेऊन त्यांची ही तपासणी करण्यात येणार आहे. तर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर यांचा मुरबाड येथे राहाणारा भाऊ हे ही कोविड – १९ टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आले असुन त्यांच्या भावाचा रिपोर्ट येण्या पूर्वी डॉक्टर हे त्यांच्या भावाच्या संर्पकात आले असल्याने त्यांनी ही स्वःता त्यांची कोविड – १९ ची टेस्ट करून घेतली असुन ते सध्या कॉरनटाईन असुन त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. तसेच नेरळ मधिल मोठया प्रमाणात रहिवासी संकुल असलेल्या बुरानीपार्क मध्ये ही एका कंटूबाला कॉरनटाईन केले असुन त्या कंटूबाला कॉरनटाईन करून एक महिना उलटला असुन त्यांचा कोणताही प्रशासना कडून अधिकृत पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाला नसुन नेरळ मध्ये बुरानीपार्क मध्ये कोविड – १९ चे रूग्ण सापडल्याची अफवा ही उठवली जात असल्याचे बोले जात आहे या संपूर्ण घटनेमुळे नेरळ मध्ये भितीचे सावट पसले आहे. तर नेरळ ग्राम पंचायती कडून नेरळ मध्ये भाजी तसेच अत्यवश्यक वस्तूची दुकाने पूर्ण पणे बंद ठेवणार असल्याचे सांगण्यात आले असुन नेरळ मध्ये पोलीसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असुन फालतू बाहेर पडणारे व फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे नेरळ पोलीस ठाण्याचे निरिक्षक अविनाश पाटील यांच्या कडून सांगण्यात आले आहे.