मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर खोपोली पोलिसांची कारवाई

0
1868

खोपोली

तुम्ही घरात बसा असे आवाहन करूनही आपल्याला काय फरक पडत नाही या आवेशात सगळे नियम झिडकारून *मॉर्निंग वॉकला* बाहेर पडलेल्या काही अतिउत्साही खोपोलीकरांना दिनांक 17 एप्रिल 2020 रोजी सकाळीच कायद्याच्या परिभाषेत खालापूर तालुक्याचे उप-विभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसी खाक्या दाखवला गेला.
सचांरबंदी लाँकडाऊन असुनही माँर्निगं वाँक करत असलेल्या 63 पुरुष 3 महीलांवर खोपोली पोलीसांची मुंबई पोलीस ऍक्ट 68 प्रमाणे केली कारवाई.पकडलेल्या या सर्वांना खोपोली पोलीस स्टेशन येथे बसवून ठेवण्यात आले.
खालापूर तालुक्याचे पोलीस उप विभागीय अधिकारी डॉ.रणजित पाटील,खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक धनाजी क्षीरसागर,सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीशआसवर,पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग,सहाययक पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे,पोलीस नाईक प्रदीप कुभांर,पोलीस कॉन्स्टेबल राहुल भडाले,निशांत पिंगळे व ईतर कर्मचा-यांची मोठी कारवाई.
आजच्या पोलिसी कारवाईचे खोपोलिकांकडून मनापासून स्वागत होत आहे,याची खरोखरच गरज होती.त्या शिवाय हे सुशिक्षित असूनही अडाणी अतिशहाने यांना चाप बसणार आहे.
आज मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या व खोपोली पोलीस स्टेशन येथे हजर केलेल्या सर्वांच्या मनात हीच भीतीयुक्त भावना असेल,

*ये कहा आ गये हम*