आजचा दिनविशेष – १७ फेब्रुवारी मृत्यू इ.स.- १८८३ आद्य क्रांतिकाराचा अंत

0
115

इतिहास अभ्यासक  संजय वझरेकर सर यांचे विश्लेषण खास त्यांच्या लेखणीतून…

१८५७ चे राष्ट्रीय अग्रिकांड थंड झाले होते. आता तर ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य जाऊन खुद्द ब्रिटिशांचे राज्य या देशावर आले होते. शिवाय त्यांच्या कायद्याचे राज्य या संकल्पनेवर विश्वास ठेवणारी एक नवी ब्रिटिश समर्थनीय पिढी या उभ्या हिंदुस्थानात उगवली असताना आता ब्रिटिशांविरद्ध बंड करायची कुणाची माय व्याली होती ? होती । माय व्याली होती, बळवंत फडक्यांच्या वासुदेवाची …..पेशव्यांच्या या शेवटच्या सेनापतीची, वासुदेवाची झोप उडाली होती. इंग्रजांच्या जुलमी राजवटीमुले बेचेन झाला होता तो. त्या गोऱ्या अधिकाऱ्यांच्या चैनीमुळे,  पेशव्यांची एका एका दाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते या देशातील भूमी पुत्रांना, जेथे एकेकाठी सोन्याचा धूर निघत होता. हे सारे ‘याची देही याची डोळा’’ त्यांना पाहावत नव्हते. त्याला त्यांनी विरोध केला आपल्या ओजस्वी वाणीने. पण, त्याच वाणीचे नाणे खणखणीत न वाजल्याने त्यांच्यातील क्रंतिज्योत पेटली आणि त्यांद्या बंदुकीच्या गोळ्यांचे बार तिकडे इंग्लंडला पार्लमेंटमभ्ये ऐकायला येऊ लागले. तथापि अपयश आले आणि मग….हैतात्म्य ।

रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावी ४ नोव्हेंबर १८४५ रोजी वासुदेवांचा जन्म झाला. त्यांच्या पूर्वजांना कर्नाळ्याच्या किल्ल्याची किल्लदारी दिली होती. दुसऱ्या बाजीरावाच्या पतनानंतर फडक्यांनी कर्नाळा किल्ल्ह्या सहजासहजी खाली न केल्याने इंग्रजांना युद्ध करावे लागले. तीन दिवसांनी किल्ल्ह्या इंग्रजांच्या स्वाधीन झाला तेव्हा फडक्यांची सारी दौलत इंग्राजांनी जप्त केलीं, तरी घराची परिस्तिथी चांगली होती.

आपल्या आजोळी कल्याण येथे इंग्रजीतून प्राथमिक शिक्षणाचे धडे त्यांनी गिरवले. पुढे मुंबईत व नंतर पुण्यात शिक्षणासाठी ते जेले. पण पुस्तकी शिक्षणापेक्षा त्यांचा कल होता मर्दानी शिक्षणाकडे. पुण्यात उस्ताद लहुजीबाबांकडे नेमबाजी, तलवारबाजी, मलविद्या सर्व काही शिकून ते नोकरीही करू लागले. प्रथम पत्नीचे निधन झाल्यावर गोपिकाबाईशी त्यांचा विवाह झाला आणि पुण्यात त्यांनी आपले बि-्हाड केले. पुण्याच्या मिलिटरी अकाउंट्सच्या कार्यालयात ते नोकरी करत होते,.

. या काळात त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा एक दुःखद प्रसंग घडला. आई आजारी असतानाही त्यांना रजा मिळाली नाही आणि मिळाली तेव्हा घरी पोहोचतो तर आईने कायमची रजा घेतली होती.आपल्या आईची आपण सेवा करू शकलो नाही, कारण आपली मातृदेवता परकीयांची गुलाम आहे. हे परके कोण तर इंग्रज । या इंग्रजांना मी हाकलून देईन त्यासाठी हातात थाळी वाजवत शनिवारवाड्यावर व्याख्याने सांगायला त्यांनी सुरुवात केली. भेळ खात खात ही व्याख्याने पुणेकर ऐकत होते. उत्तर पेशवाइला कंटाळलेले आणि ब्रिटिशांच्या तोफा, बंदुकींचे आवाज ऐकलेले पुणेकर ही व्याख्याने ऐेकून म्हणत, ‘इंग्रजांचे राज्य उलथवणे हा काय शब्दांचा खेळ आहे. याला वेडबीड तर लागलं नाही ना.” तेव्हा निराश न होता वासुदेवांनी आपला मार्ग बदला. बहुजन समाजातील रामोश्यांना त्यांनी हाताशी धरले. आदिवासी, कोळी यांनाही त्यांनी हाक दिली. रामोशी, कोळी यांना शिवशाहीत, पेशवाईत जे मानाचे स्थान होते ते इंग्रजांमुळे  गेल्यामुळे ते ब्रिटिशांच्या विरुद्ध बंडास तयार झाले. लोकमान्य टिकळकही सुरुवातीला फड़क्यांच्या सेनेत सामील होते परंतु त्यांनी नंतर आपला मार्ग बदलला.

इंग्रजांविरद्दध सशस्त्र क्रांती करायला शास्त्र आणि पैसा पाहिजे. धनिक लोक पैसा द्यायला सहजासहजी तयार नव्हते तेव्हा शिवछत्रपतींचा आदर्श समोर ठेवून त्यांनी धनिकांवर हल्ले केले. अल्पावधीत त्यांचे नाव भारतभर गाजले. त्यांना पकडण्यासाठी चार हजारांचे पारितोषिक ब्रिटिशंनी लावले, तेव्हा इंगज राज्यपलास मारल्यास पाच हजर तर जिल्हाधिकाऱ्यास मारल्यास आठ हजार रुपयांचे पारितोषिक पेशव्यांच्या या सरदाराकडून घेऊन  जा, अशी भिंतीपत्रे त्यांनी जागोजागी चिकटवली. परिणामी इंग्रज हादरले. फडक्यांविरुद्ध मोहीम तीव्र केली. या सुमारास फडक्यांचा उजवा हात, रामोश्यांचा नेता दौलतराव नाईक मारला गेला. रामोश्यांमधला राम गेला. ते रावणासारखे वागू लागले. फडक्यांच्या

नावावर रामोशी दरोडा टाकू लागले. परिणामी क्रांती बदनाम झाली. वासुदेव निष्प्रभ झाले. इंग्रजांचा ससेमिरा चुकवत वासुदेव विजापूरजवळील देवनार येथे असता फितुरी झाली. २० जुलै, १८७९ ला डलियलने त्यांना अटक केली, तेव्हा त्यांच्या अंगात प्रचंड ताप होता. डलियलने प्रथम वासुदेवांची बंदुक हळूच काढली आणि मग छातीवर बुटाची एक जोरदार लाथ मारली. तेव्हा अशाही अवस्थेत अंगात १०३ अंश ताप असताना वासुदेवांनी त्याला सरळ लढण्याचे आव्हान केले. ते डंलियलने नाकारले. थोड़्याशा पैशाच्या लालचेने हा क्रांतिकारक नाहक ब्रिटिशिांच्या हाती सापडला. पुढे त्यांच्या व इंग्रजी कायद्याच्या राज्याप्रमाणे खटला चालला. आजन्म कारावास त्यांनी एडनच्या तुरुंगात भोगावा, अशी शिक्षा न्यायालयाने त्यांना फर्मावली.

एडनच्या तुरुंगात जन्मठेपेचा शिक्षेच्या महानाट्याचा दुसरा अंक वासुदेवपर्वाचा सुरू झाला. नरकातही इतका छळ होत नसेल इतका छळ वासुदेवांचा इथे झाला. अशाही अवस्येत १२ ऑँक्टोबर, १८८० रोजी अंगात भीमशक्ती संचारली. एका हिसक्यात बेडया तोडल्या. दरवाजा उघडला आणि तुरुंगातून

पलायन केले. पण त्या निर्जन बेटावरून जाणर कोठे? कारण जाण्यासाठी कोणतीही साधने उपलय नव्हती. परिणामी त्यांची पकड झाली, आणि मग मात्र हालअपेष्ठाना  पारावारच उरला नाही त्या हालअपेष्ठानचे वर्णनही करायची इच्छा होत नाही. अखेर बलदंड शरीराचा पार सापळा झाला होता. त्यांना तपासणारा डॉक्टर सुदैवाने मराठी होता एडनला रवाना होण्यापर्वी मोव्या प्रयासाने आणलेल भारतभूमीची मृत्तिका त्याच्या हातून आपलया हातात ओतायला द्यांनी सांगितली आणि हा देह १७ फे बुवारी, १८८३ रोजी पंचत्वात विलीन झाला. मृ्यूपूर्वी ते म्हणाले, “‘दधिची ऋषींनी  आपल्या अस्ती देवांसाठी दिल्या मग। भारतीयांनो, मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये’?’ त्यांच्या या हौतात्म्यामुळे जिवंतपणी त्यांना दरोडेखोर म्हणणारे आता त्यांना आद्यक्रांतिकारक म्हणू लागले, याची खंत त्यांची पत्नी गोपिकाबाई यांना आपल्या मृत्यूपर्यत ११ सप्टेंबर,१९४० पर्यत होत होती. फडक्यांच्या बलिदानातून अनेक क्रांतिरत्ने जन्माला आली. चाफेकर बंधू हे त्यापैकीच.

17 फेब्रुवारी– इतर दिनविशेष:-

* १६७३ – फ्रेंच नाटककार, विनोदी लेखक मोलिअर यांचे निधन.
* १७४० -आधनिक पर्वत रोहणाचा जनक होरॅस बेनेडिक्स साॉस्पूरे यांचा जन्म
* १७८९ – स्टेथास्कोपचे संशोधक येने थीडोफाईन यांचा जन्म ।
* १८0३  – मंबईच्या फोर्ट भागात आग लागली.
* १८३६ – सत्पुरूष वेदान्तप्रतिपादक आणि स्वामी विवेकानंदांचे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांचा जन्म.